बघायला गेलं तर ‘आशा जाओर माझे’ बंगाली सिनेमा आहे; पण त्यात एकही संवाद नाही. सिनेमातील नायक-नायिकेचं नुकतंच लग्न झालेलं असतं. दोघांमध्ये नितांत सुंदर प्रेम; पण ते व्यक्त करायला ना वेळ आहे ना शब्द. तरीही सिनेमा आपल्या हृदयापर्यंत जाऊन पोहोचतो. खूप कमी सिनेमांमध्ये चित्रभाषेचा सुंदर वापर झालेला पाहायला मिळतो. ‘आशा जाओर माझे’मध्येही तो आपण पाहू शकतो.
- सुदर्शन चव्हाण