यापूर्वी आशिया करंडक आणि आता चॅम्पियन्स ट्रॉफी या पाकिस्तानला यजमानपद मिळालेल्या दोन बहुराष्ट्रीय क्रिकेट स्पर्धा. गेल्या अनेक वर्षांत पाकिस्तानमध्ये आपण कोणत्याही परिस्थितीत खेळलो नाही आणि खेळणारही नाही. ‘बीसीसीआय’ अर्थात भारतीय क्रिकेट मंडळाची ही ठाम भूमिका पाकिस्तान क्रिकेट मंडळाला चक्रव्यूहात अडकवणारी आहे.