- श्रीराम खाडिलकर, shriramk1@rediffmail.com
विसाव्या शतकाच्या प्रारंभी भारतीय कलाप्रकारावरच्या पाश्चात्त्य प्रभावाला प्रत्युत्तर देण्यासाठी ‘बंगाल स्कूल’ची स्थापना झाली. मुळात सांस्कृतिकदृष्ट्या एक समृद्ध राज्य असा पश्चिम बंगालचा लौकिक होता. भारतीय चित्रशैलीच्या चित्रनिर्मितीचं एक तंत्र म्हणून ‘बंगाल स्कूल’ची ओळख होती. मात्र, या कलाशैलीनं कलाचळवळीचं रूप घेतलं.