प्रसाद कानडे
भारतीय विमानसेवेचा विचार करताना गेल्या ११ दिवसांत सुमारे २८५ विमानांना बॉम्बनं उडवून देण्याची धमक्या मिळाल्या. सुदैवानं त्या सर्व खोट्या ठरल्या. मात्र यामुळे भारतातील हवाई क्षेत्राचं मोठं नुकसान झालं. केवळ धमक्यांमुळं सुमारे एक हजार कोटी रुपयांचे नुकसान झाले. विमानांना भारतीय अवकाश सुरक्षित असताना हे सारे जाणीवपूर्वक घडविण्यात आले. भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा होऊ पाहणाऱ्या हवाई क्षेत्राला केवळ हादरे देणे याचा एवढा मर्यादित हेतू नाही तर आपले वर्चस्व टिकून राहावे, भारत हा हवाई क्षेत्रात उत्पादक म्हणून पुढं न येता केवळ बाजारपेठ म्हणूनच त्याचं अस्तित्व राहावं या हेतूनं प्रस्थापित राष्ट्रांकडून खेळी खेळण्यात येत असल्याचं हवाईतज्ज्ञाचं म्हणणं आहे.