अवघ्या दीडेक महिन्यांपूर्वी, २७ सप्टेंबरला ‘बीएसई-सेन्सेक्स’ने ८५,९७८ अंशांचा उच्चांक गाठला, तेव्हा अनेक जण असे म्हणत होते, की आता एक लाख अंशांचा टप्पा फार दूर नाही. परंतु, या उच्चांकापासून ‘सेन्सेक्स’ १० टक्के घसरून १४ नोव्हेंबरला तो ७७ हजार ५८० अंशांवर बंद झाल्यानं अनेकांचा धीर सुटत चालला आहे.