काळ वेगानं बदलतो आहे. आपली जीवनशैली, आपल्या गरजा आणि आपल्यापुढील समस्यांचं स्वरूपही बदलत आहे. आज सुबत्ता आणि आर्थिक सुस्थिती यांचं प्रमाण वाढलेलं आहे. पण त्याचबरोबर जीवन हे अतिशय धकाधकीचं झालंय, प्रचंड वेगवान झालं आहे. आपली विरंगुळ्याची, मनोरंजनाची साधनंही बदलत चालली आहेत आणि त्यात कमालीचं वैविध्य आता आपण अनुभवू शकतो.
परंतु त्याचबरोबर माणसं एकलकोंडी बनण्याचं प्रमाणही वाढत चाललं आहे. मौजमजेच्या अन् चैनीच्या गोष्टी बदलत आहेत. खाण्यापिण्याच्या सवयीही बदलत आहेत. पण त्यासोबत इतर अनेक व्याधी आणि आजारही वेगाने फोफावू लागले आहेत. निवृत्तिवेतन ही संकल्पना हळूहळू कालबाह्य होऊ लागली आहे. मात्र वाढत्या वयातील वाढत्या आजारांवरील उपचाराचा खर्च दिवसेंदिवस खूपच वाढत चालला आहे.
वाढलं आयुर्मान पण महाग झाले उपचार
उतारवयात शारीरिक तक्रारीही डोकं वर काढू लागतात. गुडघे बोलू लागतात, हृदयविकारापासून कर्करोगापर्यंत रोग आक्रमण करू लागतात. रक्तदाब, मधुमेह हे तर घरोघरी सर्वत्र आढळतात. सध्याच्या आधुनिक युगात माणसाचं आयुष्मान वाढत चाललं असलं, तरी आरोग्याच्या समस्या आणि त्यांच्या उपचारावरील खर्च प्रचंड प्रमाणात वाढत आहेत.
अशा वेळेस जर घरातील ज्येष्ठांचे जर एखादे गंभीर आजारपण अचानक उद्भवले, तर घरातल्या सगळ्यांची तारांबळ उडण्याची शक्यता दाट असते. कारण सगळी सोंगं आणता येतात, पण पैशाचं सोंग आणता येत नाही, या उक्तीप्रमाणे अशा वेळेस रुग्णाची चिंता आणि दुसरीकडं पैसे उभे करण्याची काळजी अशा दुहेरी कात्रीत नातेवाईक सापडतात.
आपल्या जवळच्या आणि समाजातील इतर ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्यासाठी आपण सर्वांनी एक जबाबदार भूमिका पार पाडायला हवी, असं माझं मत आहे. त्यामध्ये आपण त्यांची काळजी घेणं, त्यांना वेळ आणि आधार देणं इत्यादी गोष्टींचा अंतर्भाव होतो. आता आपण बघतो की काळ बदलत गेला तसं आजारी पडल्यावर उपचार घेण्याच्या पद्धतीही बदलत गेल्या.
आता आर्थिक परिस्थिती चांगली असलेल्या ज्येष्ठांचा खासगी रुग्णालयाकडे कल असतो. इतर लोक सरकारी रुग्णालयात प्रथम जातात. या दोन्ही ठिकाणी पाहिलं आहे की जेमतेम दहा टक्के लोकांकडं कुठलातरी हेल्थ इन्शुरन्स असतो. बाकीच्या ९० टक्के लोकांकडे अशा अनपेक्षित उद्भवणाऱ्या आजारांसाठी कोणतेही आर्थिक नियोजन नसते आणि त्यामुळे निर्माण होणाऱ्या अनेकविध समस्यांची कल्पना आपण करू शकतो. हे चित्र बदलायला हवे.
प्रत्येक ज्येष्ठ नागरिकाला भक्कम आर्थिक नियोजनाचा आधार द्यायला हवा. या पार्श्वभूमीवर सकाळ सह्याद्री सुरक्षा कवचनं जो पायंडा पडला आहे, तो आदर्श आहे, अनुकरणीय आहे, असं मला वाटतं... आज आपण बघतो की कित्येक वयस्कर रुग्ण शस्त्रक्रियेकरिता, उपचाराकरिता एकटे येतात आणि साहजिकच सत्तरी वगैरे ओलांडलेल्या व्यक्तींची हॉस्पिटलमधील औपचारिकता पूर्ण करताना तारांबळ उडते.
माझं तरुण मुलामुलींना असं सांगणं आहे की तुम्ही तुमच्या व्यस्त दिनक्रमातून पालकांना वेळ देऊ शकत नसाल, तर त्यांना सुरक्षा कवचसारख्या उपक्रमाचे सभा सदस्यत्व घेऊन द्या. शक्य होईल तेवढं त्यांचा आधार बना. नाहीतर त्यांचे प्रश्न सोपे करा... त्यांना सकाळ आणि सह्याद्री सारखा विश्वासार्ह आधार द्या.
कोणत्याही चेकअप शिवाय इतके फायदे, सवलती आणि तज्ज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन बहाल करणारे हे कवच अनेक दृष्टीने एकमेवाद्वितीय अन् वैशिष्ट्यपूर्ण आहे. कारण यात औषधे, तपासण्या, तज्ज्ञांचा सल्ला, हॉस्पिटलायझेशन या सर्वांवर अधिकतम १.७५ लाखांपर्यंत सूट दिली जाते.
विचारपूर्वक आखलेली योजना
इतर कोणत्याही हेल्थ इन्शुरन्सच्या तुलनेने सकाळ सह्याद्री सुरक्षा कवच कित्येक पटीने सरस आहे. किंबहुना कवचमधील काही वैशिष्ट्ये अशी आहेत, की ज्यामुळे या दोहोंमध्ये तुलनाच होऊ शकत नाही. प्रायव्हेट हेल्थ इन्शुरन्स कंपन्या वयाची मर्यादा घालतात. खूप जास्त वयाच्या नागरिकांना त्यांच्या सेवेचा फायदा घेता येत नाही. सुरक्षा कवचमध्ये अशी वयाची कोणतीही मर्यादा नाही. शिवाय इतर कोणत्याही स्किम्स तुम्हाला आधीपासूनच भेडसावणाऱ्या आजारांना विमा संरक्षण द्यायचं नाकारतात.
मात्र सकाळ सह्याद्री सुरक्षा कवचमध्ये त्याच व्याधी स्वीकारल्या जातात, त्यावरून नाकारले जात नाही, कारण त्या तुमच्यासोबत आलेल्या असतात! कवच योजनेचे पूर्ण लाभ तुम्हाला सभासद झाल्याच्या ६० दिवसांपासून घेता येतात. मात्र इतर अनेक वर्जित बाबी असतात. ज्याच्या आधारावर या कंपन्या तुम्हाला स्किमच्या पहिल्या वर्षी किंवा काही वर्ष काही महत्त्वपूर्ण लाभ देण्याचं सोयीस्करपणानं आणि जाणीवपूर्वक टाळतात.
नवीन सवलती आणि फायदे
या सर्वसमावेशक आरोग्य योजनेच्या १७ व्या वर्षात अनेक आकर्षक सवलती आणि फायदे जास्तीचे देण्यात आले आहेत. मूळ कार्ड सोबत आता ऍड ऑन कार्डची सुविधासुद्धा उपलब्ध आहे. शिवाय लाभार्थ्यांच्या ५० वर्षांखालील नातेवाईक आणि स्नेहीजनांसाठी खास सवलती उपलब्ध आहेत. आता आंतररुग्ण म्हणजे आयपीडी सेवेमध्ये ७० टक्के सवलत मिळणार आहे.
बाह्यरुग्ण म्हणजे ओपीडी सेवांवर २० टक्के सवलत, औषधांवर २० टक्के पर्यंत सवलत, नियमित चाचण्यांवर म्हणजे ब्लड-शुगर टेस्ट इत्यादींवर ४० टक्के सवलत असेल. तर एमआरआय व सिटी स्कॅन, डायग्नोस्टिक, एक्स-रे इत्यादी तपासण्यांवर ४० टक्के सूट मिळणार आहे.
योजनेला दरवर्षीप्रमाणे उस्फूर्त प्रतिसाद मिळतो आहे आणि नवीन सभासद नोंदणीही चालू आहे. तेव्हा आजच सर्व आवश्यक बाबींची पूर्तता करून हे सुरक्षा कवच धारण करा… सभासद नोंदणी सह्याद्री हॉस्पिटलमध्ये ३० जून रविवारीही सुरू.
माझा सुखद अनुभव
मला सकाळ-सह्याद्री सुरक्षा कवचाचा फारच सुखद अनुभव आहे. मला ज्या वेळी हार्टचा त्रास झाला, त्या वेळी मला खर्चाचा विचार करता आणखीनच तीव्र वाढला होता. पण माझ्याकडे सकाळ सह्याद्री सुरक्षा कवा असल्याने मला मोठाच धीर लाभला होता. माझ्या हृदयाच्या अँजियोप्लास्टीच्या वेळी मला भरपूर सवलत तर मिळालीच पण शिवाय कॅशलेस सुविधाही मिळाली. मी पूर्ण समाधानी आहे.
अरविंद चंद्रकांत बनकर (ओळखपत्र क्र. २२/२६८)
बिलात मिळाली चांगलीच सवलत
मला मणक्याचा त्रास सुरू झाला होता आणि त्यावर ऑपरेशन हा एकच उपाय होता. मणक्याचं ऑपरेशन म्हटलं की खर्चाचा विचार करता धाकच वाटायला लागतो. माझं वर्ष २०२३ मध्ये सह्याद्री हॉस्पिटलमध्ये मणक्याचे ऑपरेशन झाले. यशस्वी ऑपरेशननंतर मी माझ्या नेहमीचा स्थितीत आलो. मला फारच उत्तम उपचार मिळाले आणि शिवाय बिलात भरपूर सवलतही मिळाली. ज्येष्ठ नागरिकांसाठी अतिशय उपयुक्त अशी ही योजना आहे.
ए. डी. कर्वे (ओळखपत्र क्र. १०/१९०४)
उत्तम उपचार आणि सवलतही भरपूर
मी सकाळ सह्याद्री सुरक्षा कवचाची सभासद आहे. मला याचा खूप चांगला अनुभव आहे. काही काळापूर्वी माझ्या गुडघ्याचं प्रत्यारोपण सह्याद्रीमध्ये झालं. मला उत्तम उपचार मिळाले, ऑपरेशन खूपच चांगले झाले. सकाळ सह्याद्री सुरक्षा कवच योजनेची सभासद असल्याने मला बिलातही भरपूर सवलत मिळाली. मी आभारी आहे. सर्व ज्येष्ठ नागरिकांनी याचा लाभ घ्यावा, अशी आग्रही शिफारस मी करीत आहे.
लता सूर्यकांत वैद्य (ओळखपत्र क्र. २२/३५२)
हे कवच म्हणजे मोठा आधारच
सकाळ सह्याद्री सुरक्षा कवच योजनेचा सभासद झाल्याक्षणीच मला एक आधार लाभल्यासारखं होतं आणि मला पुढे ते किती आवश्यक होतं याची प्रचितीही आली. माझी सह्याद्री, डेक्कन हॉस्पिटलमध्ये दोन ऑपरेशन झाली. दोनही वेळेस मला सर्वोत्तम वैद्यकीय उपचार मिळाले, शिवाय सुरक्षा कवचामुळे बिलात सवलतही मिळाली. सर्व ज्येष्ठ नागरिकांनी या आगळ्या वेगळ्या योजनेचा सभासद व्हावं आणि स्वत:ला आणि आपल्या कुटुंबीयांना एक आधार उपलब्ध करून द्यावा.
अरविंद बापू चिव्हे (ओळखपत्र क्र. १६/७९२३)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.