संपूर्ण जगाला वेड लावणारा आणि लक्ष वेधून घेणारा ऑलिंपिकचा सोहळा पार पडला. विविध खेळांतील सर्वोत्तम खेळाडूंना आपापल्या देशासाठी सर्वस्व पणाला लावून खेळताना बघताना समाधानानं मन भरून गेले. पाकिस्तानच्या अर्शद नदीमने भालाफेकीत मिळवलेले सुवर्ण आणि दुखापत झाली असतानाही चांगली भालाफेक करून नीरज चोप्राने मिळवलेले रजत पदक सर्वांत जास्त लक्षात राहिले.