मावळ्यांनो, पुतळ्याच्या घटनेतून शिका. जे माथी भडकवतात त्यांच्या पायावर डोकं ठेवू नका. जे मेंदू घडवणार आहेत त्यांचा शोध घ्या. लढायची खुमखुमी असेल तर सैन्यात जा. कुठल्या टोळक्यात सामील होऊ नका. कुणाच्या तरी आदेशाने माझ्या गडावर येऊ नका. मनातून वाटेल तेव्हा या. डोळ्यात तेल घालून लक्ष राहू द्या आणि पुतळा पडल्याच्या घटनेतून एक गोष्ट नक्की शिका... पक्ष आणि नेता कुणीही असू द्या; अन्यायाविरोधात बोलत राहा.