- विजय राउत, vijay.animaster@gmail.com
नेमका पुतळा कसा असू नये, याचे उदाहरण म्हणजेच नवशिक्या जयदीप आपटे यांनी बनवलेला पुतळा आहे. हे शिल्प तयार करताना गुरुत्वाकर्षणाच्या प्रभावाचा कुठेच विचार केलेला दिसत नाही. शिल्पाचा जो हात पुढे आहे, तोच पायही पुढे आहे आणि जो हात मागे आहे तोच पायही मागे आहे. लय, तोल आणि ऊर्जाच या शिल्पात दिसत नाही. आपण साधी विटांची भिंत बांधतानाही त्या एकमेकांवर सरळ न लावता एकमेकांचा तोल सांभाळतील, अशा प्रकारे रचतो. नकळत का होईना, तो गवंडीही गुरुत्वाकर्षणाच्या प्रभावाचा विचार करत असतो...