- मुक्ता चैतन्य, muktaachaitanya@gmail.com
वयात येणारी मुलं आणि मुली स्वतःची ओळख शोधत असतात. समाजात वावरताना, तसंच शाळा-कॉलेजमध्ये, घरात आपण नक्की कोण आहोत, कसे आहोत, आपल्या आवडी-निवडी काय आहेत, लैंगिक अग्रक्रम काय आहेत अशी चोहोबाजूंनी चाचपणी सुरू असते. या स्व-ओळखीच्या प्रवासात इंटरनेट हा त्यांना सगळ्यात जवळचा सहप्रवासी वाटतो; कारण, इथं पाहिजे त्या विषयात शिरून भटकंती करता येते, गुगलला हवे ते प्रश्न विचारता येतात आणि विचारलेल्या प्रश्नांबद्दल गुगल जजमेंटल होत नाही.