- प्रा. विशाल गरड, vishalgarad.18@gmail.com
पहिले समाजव्यवस्थेचे वर्गीकरण जातींच्या आधारे होते तेच आता शिक्षणानं केलं जातंय. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र ही जुनी चातुर्वर्ण्य व्यवस्था बदलून आता वर्ग १, २, ३ आणि ४ अशी झाली आहे. व्यवस्था तशीच आहे फक्त ती जातीच्या आधारावरून न ठरवता शिक्षणाच्या आधारे ठरवली जातेय. यात चांगली गोष्टी अशी आहे, की वर्ग चार पदावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्याचा मुलगा किंवा मुलगी शिक्षणाच्या जोरावर वर्ग एक पदावर जाऊ शकते.