- नीलेश निमकर, nilesh.nimkar@quest.org.in
लहान वयात मुलांवर होणाऱ्या लैंगिक अत्याचाराचे परिणाम फार दूरगामी असतात. शारीरिक हानी एक वेळ काही काळाने भरून निघते पण अशा अत्याचारातून होणारे मानसिक, भावनिक नुकसान फार गुंतागुंतीचे असते. ते भरून निघणे अवघड असते. बदलापूरमधील शाळेत घडलेल्या बाललैंगिक अत्याचार प्रकरणात बळी पडलेल्या मुलींना आणि त्यांच्या पालकांना सध्या कोणत्या मानसिक यातनांतून, सामाजिक ताणताणावातून जावे लागत असेल याची कल्पना करणेही अवघड आहे.