कावळ्यांनी ठरवून टाकलेलं असतं, की आता जगायचं ते माणसांच्या जीवावर. जनतेच्या जीवावर त्यांना आयुष्य काढायचं असतं. कावळा ओरडला, की जुने लोक म्हणायचे, पाहुणे येणार... कावळ्याच्या ओरडण्यातून तो संकेत मिळायचा; पण पुढारी दिसला की मात्र खात्री होते की निवडणूक आली. आता प्रचाराला लोक येणार. मोठमोठ्याने स्पीकरवर घोषणा होणार...