- मुक्ता चैतन्य, muktaachaitanya@gmail.com
सायबर-गुलामगिरी. शब्द कितीही नवा आणि विचित्र, वेगळा वाटला तरीही आधुनिक जगाचं आणि सायबर-गुन्हेगारीचं हे भीषण वास्तव आहे. ‘नोकरी मिळवून देतो’, ‘लाखो रुपयांचा पगार मिळेल’ अशी आमिषं दाखवून बेरोजगार तरुण-तरुणींना जाळ्यात ओढलं जातं आणि जिवाची भीती घालून सायबर-गुन्ह्यांची रॅकेट्स चालवणाऱ्या टोळीत त्यांना काम करायला भाग पाडलं जातं.