सोमवार : ': चैत्र कृष्ण १४, चंद्रनक्षत्र अश्विनी, चंद्रराशी मेष, चंद्रोदय पहाटे ५.४२, चंद्रास्त सायंकाळी ५.५४
पंचांग
सोमवार : ': चैत्र कृष्ण १४, चंद्रनक्षत्र अश्विनी, चंद्रराशी मेष, चंद्रोदय पहाटे ५.४२, चंद्रास्त सायंकाळी ५.५४, अमावास्या प्रारंभ रा. ९.५६, भारतीय सौर वैशाख २० शके १९४३.
दिनविशेष -
१८९९ : रँड वधाच्या प्रकरणी फितुरी करणाऱ्या द्रविड बंधूंना ठार करून धडा देणारे क्रांतिवीर महादेव रानडे यांना फाशी देण्यात आली.
१९०९ : आंतरराष्ट्रीय कीर्तीचे भारतीय ग्रंथालयशास्त्रज्ञ बेल्लारी श्यामण्णा केशवन यांचा जन्म. त्यांचे विशेष उल्लेखनीय कार्य म्हणजे भारतीय राष्ट्रीय ग्रंथसूची.
१९४० : प्रसिद्धिपराङ्मुख म्हणून लौकिक असलेले माणिक गोडघाटे ऊर्फ कवी ग्रेस यांचा जन्म. 'संध्याकाळच्या कविता', 'चंद्रमाधवीचे प्रदेश', 'सांध्यपर्वातील वैष्णवी' हे त्यांचे कवितासंग्रह, तर 'चर्चबेल', 'मितवा' हे त्यांचे ललित लेखसंग्रह प्रसिद्ध आहेत.
१९९३ : जगातील सर्वोच्च ८४४८ मीटर उंचीचे एव्हरेस्ट शिखर सर करण्याची कामगिरी भारताच्या तीन महिला सदस्यांच्या तुकडीने केली. त्यांतील संतोष यादवने हे शिखर दुसऱ्यांदा सर करणारी पहिली भारतीय महिला होण्याचा मान मिळविला.
२००१ : ज्येष्ठ राजकीय नेते, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि हिमाचल प्रदेशचे माजी राज्यपाल सुधाकर नाईक यांचे निधन.
राशिभविष्य -
मेष: आरोग्य उत्तम राहील. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल.
वृषभ: काहीना कामाचा ताण व दगदग जाणवेल. खर्चाचे प्रमाण वाढेल.
मिथुन : आर्थिक सुयश लाभेल. महत्त्वाचे पत्र व्यवहार पार पडतील.
कर्क: सामाजिक प्रतिष्ठा लाभेल. नोकरीत समाधानकारक स्थिती राहील.
सिंह: एखादी महत्त्वाची वार्ता समजेल. गुरुकृपा लाभेल. जिद्द व चिकाटी वाढेल.
कन्या: आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको.
तूळ: जोडीदाराचा सल्ला लाभदायक ठरेल. कामात सुयश लाभेल.
वृश्चिक: सहकार्याची अपेक्षा नको. वस्तू गहाळ होणार नाहीत याची दक्षता घ्यावी.
धनू : संततिसौख्य लाभेल. नवीन परिचय होतील. जिद्द व चिकाटी वाढेल.
मकर: प्रॉपर्टीची कामे विचारपूर्वक करावीत. मनोबल उत्तम राहील.
कुंभ: जिद्दीने कार्यरत राहाल. नोकरीत समाधानकारक स्थिती राहील.
मीन: आर्थिक लाभाचे प्रमाण समाधानकारक राहील. महत्त्वाचे निर्णय मार्गी लागतील.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.