सप्तरंग
दख्खनी चित्रशैली: सांस्कृतिक देवाण-घेवाण
नर्मदेच्या आणि विंध्य पर्वताच्या दक्षिणेकडच्या भारताच्या मध्यभागावर विस्तारलेला द्वीपकल्प म्हणजे दख्खन होय. ‘दख्खन’ हा शब्द ‘दक्षिण’ या संस्कृत शब्दापासून तयार झाला.
- दुर्गा आजगांवकर, ajg.durga17@gmail.com
नर्मदेच्या आणि विंध्य पर्वताच्या दक्षिणेकडच्या भारताच्या मध्यभागावर विस्तारलेला द्वीपकल्प म्हणजे दख्खन होय. ‘दख्खन’ हा शब्द ‘दक्षिण’ या संस्कृत शब्दापासून तयार झाला. महाराष्ट्री प्राकृतचा अपभ्रंश म्हणूनही तो ओळखला जातो. इथं सोळाव्या आणि सतराव्या शतकाच्या दरम्यान बहरलेली संस्कृती म्हणजे ‘दख्खनी’ संस्कृती. ही संस्कृती पठारापासून ते तिथल्या देहबोलीपर्यंत सगळ्यात गुंफलेली आहे. पर्शियन, इराणी, तुर्कमन यांच्या मिलाफातून ही संस्कृती परिपक्व झाली, तिथल्या मातीत रुजली.