माणसाची अडथळे ओळखण्याची क्षमता अतीव जागृत आहे. त्याला येणारे अडथळे डोळ्यांनी दिसतात, कानांनी ऐकू येतात, नाक आणि त्वचेच्या संवेदनांमधून त्याला अगदी सूक्ष्म संवेदनाही जाणवतात. शिवाय त्यावर मात करण्यासाठी त्याच्याकडे बुद्धी नावाचे शस्त्र आहे. त्या शस्त्राच्या आधारे तो प्रतिकाराची तयारी करू शकतो. मात्र एवढे असूनही माणूस चुका करायचा थांबत नाही. जेवढा तो प्रगत होतोय तेवढ्या चुका वाढत आहेत. या चुकांमधून तो सुधारेल असे वाटते; मात्र तसे होत नाही. दुसऱ्यास लागलेली ठेच पाहूनही तो शहाणा होत नाही.