अमेरिकी मतस्वातंत्र्याची सातत्यानं चर्चा होते. या मतस्वातंत्र्यावर अमेरिकी सरकार, सरकारी व्यवस्था अंकुश ठेवण्यासाठी किती प्रयत्न करत असतात यावर ताज्या अहवालाद्वारे प्रकाश पडतो.
अमेरिकेच्या लोकप्रतिनिधी सभागृहाकडं ता. ३० ऑक्टोबरला एक अहवाल सादर झाला. त्या अहवालात ‘न्यू यॉर्क पोस्ट’ या अमेरिकी वर्तमानपत्रातल्या एका बातमीचा किस्सा आणि त्याअनुषंगानं समाजमाध्यम-कंपन्यांचा राजकीय हस्तक्षेप यांचा पुरावा सादर केला गेला आहे.