सुरक्षेची ऊब, आनंदाची ऊर्जा देणारं कवच

काळ वेगानं बदलतो आहे आणि लोकांची जीवनशैलीही. वैद्यकीय सेवा अन् अत्याधुनिक सुविधा सातत्याने विकसित होत आहेत. पण विविध समस्याही भेडसावू लागल्या आहेत.
सुरक्षेची ऊब, आनंदाची ऊर्जा देणारं कवच
Updated on

- डॉ. अतुल जोशी, saptrang@esakal.com

काळ वेगानं बदलतो आहे आणि लोकांची जीवनशैलीही. वैद्यकीय सेवा अन् अत्याधुनिक सुविधा सातत्याने विकसित होत आहेत. पण विविध समस्याही भेडसावू लागल्या आहेत. एक गोष्ट जी मुळीच बदलली नाही आणि कधी बदलणारही नाही, ती म्हणजे ज्येष्ठांच्या आरोग्यविषयक समस्या आणि त्यांना असलेली विनाविलंब आधाराची गरज.

आजच्या युगात इंटरनेटमुळे माणसं अधिक जवळ आली आहेत. पण शहराचा वाढता आकार, ट्रॅफिकच्या अडचणी यामुळे अंतरे वाढत आहेत. अशा वेळेस ज्येष्ठ नागरिकांनी स्वतःसाठी किंवा त्यांच्या पुढच्या पिढीने वृद्ध पालकांसाठी सकाळ सह्याद्री सुरक्षा कवच सभासदत्वाची तजवीज करणं ही आजची गरज आहे. कारण इतर विमा योजनांप्रमाणे हे कवच फक्त हॉस्पिटलचा खर्च कमी करत नाही. तर सुरक्षेची ऊब, आनंदाची ऊर्जा आणि ॲक्टिव्ह लाईफची प्रेरणा देतं.

मी गेली २५ वर्ष पुण्यात फिजीशियन म्हणून प्रॅक्टिस करत आहे. माझ्या कडे येणारे रुग्ण हे रक्तदाब, मधुमेह, हृदयविकार, तापाचे विकार आदी आजाराचे असतात. बहुतांशी लोक हे ६० वर्षांवरील म्हणजे ज्येष्ठ नागरिक असतात. या वयोगटातील प्रत्येकाला मी ‘सकाळ सह्याद्री सुरक्षा कवच’ चे सभासद होण्याचा सल्ला देईन.

कारण बऱ्याचदा या लोकांचा औषधावरील मासिक खर्च हा काही हजारात जातो. त्यामुळे आर्थिक चणचण नक्कीच जाणवते. वैद्यकीय विमा असला तरी इस्पितळात दाखल झाल्याशिवाय या विम्याचा लाभ घेता येत नाही. परंतु सकाळ समूह व सह्याद्री हॉस्पिटल यांनी सुरू केलेल्या ‘सकाळ सुरक्षा कवच’ या योजनेचा मात्र लोकांना नक्की लाभ होतो.

या योजनेचे अनेक फायदे आहेत. जे तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला, वैद्यकीय तपासण्या, औषधांचा खर्च, हॉस्पिटलायझेशन या सर्वच बाबतीत अतिशय उपयोगी आहेत. या योजनेला वयाची अट नाही. कितीही वय झाले असले तरी या योजनेत सहभागी होता येते. विशिष्ट आजार असतील तर लाभ मिळणार नाही असे काही नाही. कोणत्याही पूर्व चाचण्या नाहीत.

म्हणूनच गेल्या काही वर्षांमध्ये मी अनेक रुग्णांना या योजनेचे सदस्य होण्यासाठी प्रवृत्त केले आहे. तसेच इतर विम्यामध्ये ठरावीक वयानंतर वैद्यकीय विमा मिळणे अधिकाधिक कठीण होते किंवा फारच महाग होत जाते. उलट सुरक्षा कवच मध्ये सभासदांना नोंदणीशुल्काच्या कित्येक पट किमतीच्या सेवासुविधांचा दरवर्षी फायदा होतो.

Sakal Sahyadri Suraksha Kavach
Sakal Sahyadri Suraksha Kavachsakal

मी तर नक्कीच ज्येष्ठ नागरिकांना या योजनेत सहभागी होण्याचा नक्कीच सल्ला देईन. कारण मी अनेकांना या योजनेचा फायदा घेताना पाहिलं आहे आणि सुरक्षा कवच न घेतल्यामुळे होणारा आर्थिक ताण आणि मनस्तापही पाहिलेला आहे.

इतकंच नाही तर सुरक्षा कवचच्या सदस्यांच्या नातेवाइकांना म्हणजे त्यांच्या मुलांनादेखील ही योजना खूपच सोयीस्कर ठरते. ते या कवचावर विसंबून निश्चिन्त राहू शकतात. त्यांना प्रत्येक वेळेला वेगवेगळ्या आजारांसाठी कुठे आणि कोणाकडे जावे असे प्रश्न उद्भवतच नाहीत. त्यामुळे त्यांचा त्रास आणि मानसिक ताणही खूप प्रमाणात कमी होतो.

फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की ही योजना फक्त सह्याद्री रुग्णालयामध्ये लागू आहे. तिचा लाभ इतर कोणत्याही रुग्णालयात घेता येणार नाही. परंतु सह्याद्री समूहाची रुग्णालये पुण्यातील विविध भागात असल्यामुळं त्यांची विशेष अडचण येऊ नये.

अजून एक अत्यंत महत्त्वाची बाब म्हणजे आजपर्यंत कधीही आंतररुग्ण (IPD ) सेवांचा लाभ घेतलेला नसल्यास आपण तीस हजाराच्या नो क्लेम बोनससाठी पात्र ठरता, जो तुमच्या सवलत (कव्हर) रकमेत जोडला जातो. आणि उपलब्ध प्रमाणानुसार दोन लाख रुपयाऐवजी तुमची सवलत रक्कम (कव्हर अमाऊंट ) दोन लाख तीस हजार होते.

  • ‘सुरक्षा कवच’ योजनेची नवीन नोदणींची व नूतनीकरणाची ३१ जुलै ही अंतिम तारीख आहे. परत मुदतवाढ नाही ...त्वरा करा सभासद नोंदणी आजही सह्याद्री हॉस्पिटलच्या सर्व शाखांमध्ये सकाळी ९.३० ते सायं. ६.३० सुरू.

  • ‘सप्तरंग’मध्ये सुरक्षा कवच नोंदणी फॉर्म उपलब्ध

  • वय वर्षे ५० ते ६९ साठी योजनेचे मूल्य सहा हजार रुपये आहे, तर ७० पासून पुढील व्यक्तींसाठी मूल्य ७५०० रुपये आहे. शिवाय लाभार्थ्यांच्या ५० वर्षांखालील नातेवाईक आणि स्नेहीजनांसाठीही खास सवलती उपलब्ध आहेत. नवीन सभासद नोंदणी करताना वयाच्या दाखल्यासाठी आधार कार्ड आणि पॅन कार्डची झेरॉक्स प्रत जोडणे आवश्यक आहे.

  • संपर्क : ७७७००६६८८१ / ९६०७९६२१२८/ ९८८१०९९०६२

  • अधिक माहितीसाठी : www.surakshakawach.in

असा झाला ‘सुरक्षा कवच’ चा उपयोग

आम्ही सुरुवातीपासून सभासद

आज माझं वय ८१ आहे. माझे पती आणि मी, आम्ही दोघेही सकाळ सुरक्षा कवच योजनेच्या सुरुवातीपासून त्याचे सभासद आहोत. दर वर्षी न चुकता नूतनीकरण करतो. २०१० मध्ये माझ्या मणक्याचे यशस्वी ऑपरेशन झाले आणि माझे चालणे पूर्वीप्रमाणे व्यवस्थित झाले.

जून २०२१ मध्ये ८१व्या वर्षी कोरोना महासाथीचा धैर्याने सामना करून सुखरूप घरी परतले. या दोन्ही गोष्टी केवळ आणि केवळ सुरक्षा कवचमुळे शक्य झाल्या. ज्यांनी या योजनेचा अजूनही लाभ घेतला नाही त्यांनी तो जरूर घ्यावा अशी मी शिफारस आणि विनंती करते.

- आशा कोल्हटकर

या संकल्पनेत माणुसकीची भावना...

वेळ सांगून येत नाही म्हणतात हेच खरं ! ३१ मार्च रोजी माझे आणि माझ्या पत्नीचे सभासदत्व संपले. पण कोरोना काळामुळे त्वरेने नूतनीकरण करायला जमले नाही. आणि अशा अवस्थेत ३ एप्रिल रोजी वयाच्या ७२व्या वर्षी माझ्या पत्नीला कोरोना झाला.

मी काहीशा निराश मनःस्थितीत सकाळ सह्याद्री सुरक्षा कवचाच्या नेहा ताईंना फोन केला. त्यांनी आम्हाला केवळ धीरच दिला नाही तर पुढील सर्व मार्गदर्शन केले. मी पत्नीला सह्याद्री हॉस्पिटलमध्ये पत्नीला दाखल केले आणि सर्वप्रथम नूतनीकरण केले. मग आम्हाला सुरक्षित वाटू लागले. कोरोनावर मात करून पत्नीची तब्येत सुधारली. मी खरोखरच फार आभारी आहे नेहा ताईंचा आणि सह्याद्रीमधील स्वाती चौधरी यांचा!

कोणतीही हेल्थ इन्शुरन्स कंपनी कालावधी संपल्यावर एक तास नंतर देखील कोणत्याही प्रकारचे साहाय्य करत नाही. पण सुरक्षा कवच संकल्पनेच्या मुळाशी माणुसकीची भावना आहे असा प्रेरणादायी अनुभव आम्हाला आला...

- अशोक व कुंदा नडे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.