सह्याद्रीचा माथा : आदिमाया, आदिशक्ती, अष्टादशभुजा श्री सप्तश्रृंग निवासिनी...

Saptashrungi Devi Wani
Saptashrungi Devi Wani esakal
Updated on

सप्तश्रृंग निवासिनी आदिमाया-आदिशक्तीचं त्रिगुणात्मक अष्टादशभुजेतील अतिशय विलोभनीय, ओजस्वी, तेजस्वरुप समोर आलं आहे. शेकडो वर्षांनंतर आदिपीठातील आदिमायेचं हे रुप समोर आलं आहे. धार्मिक, आध्यात्मिक, पौराणिक क्षेत्रातील या मोठ्या स्थित्यंतरामुळे श्री सप्तश्रृंग निवासिनी देवीच्या संदर्भात अनेक गोष्टींना आता उजाळा मिळणार आहे. या संदर्भात मोठं संशोधन सुरु झालेलं आहे. आदिमायेचं हे पीठ अर्धपीठ म्हणून परिचित आहे.

पण हे अर्ध नव्हे तर आदीपीठ असल्याचे दाखले समोर येत आहेत. आदिमायेचं हे देशातील सर्वांत प्राचीन स्थान म्हणून समोर आल्यानं नाशिकचं देशात असलेलं धार्मिक महत्त्व अधिक वाढणार आहे. तज्ज्ञ धर्मशास्त्र अभ्यासकांच्या मते देवतेचं मूळ स्वरुप समोर यावं, याची तजवीज आदिमायेनंच करुन ठेवलेली असते. त्यामुळे त्यासाठीच्या योग्य- संयुक्तिक कालखंडाची वाट पाहावी लागते, जो कालखंड आता सुरु आहे. (Dr Rahul Ranalkar saptarang marathi article on wani saptashrungi devi nashik news)

श्री सप्तश्रृंग निवासिनीचं स्थान किती पुरातन आणि प्राचीन आहे, याचे संदर्भ आता संशोधक शोधून समोर आणतं आहेत. देशातील महत्त्वाच्या धार्मिक ग्रंथालयांमध्ये या संदर्भांचा सध्या शोध घेतला जातोय. त्यात जम्मू, बडोदा, काशी, कोलकाता येथील ग्रंथालयांचा समावेश आहे. नाशिकचे स्मार्त चुडामणि शांतारामशास्त्री भानोसे हे काशीतील ज्येष्ठ अभ्यासकांच्या मदतीने या प्राचीन संदर्भांचा शोध घेण्यात अग्रेसर आहेत.

आदिमाया-आदिशक्तीचं हे स्वरुप म्हणजे नवनाथांची तसेच संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांची कुलस्वामीनी आहे. पौराणिक संदर्भांमध्ये प्रभू श्रीरामचंद्र सप्तश्रृंग गडावर येऊन गेल्याचे उल्लेख आढळतात. संत निवृत्तीनाथ महाराजांनी समाधी घेण्यापूर्वी आदिशक्तीची परवानगी घेऊन ते त्र्यंबकेश्वरी समाधीस्त झाले. संतश्रेष्ठ ज्ञानदेवांनी देखील संजीवन समाधीपूर्वी देवीचं दर्शन घेतल्याचे दाखले आहेत.

ज्ञानदेवांनंतर शेकडो वर्षांनंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी देखील श्री सप्तश्रृंग मातेचं दर्शन घेतल्याचे दाखले आढळतात. सप्तश्रृंग अर्थात सात पहाडांपैकी एका गडावर छत्रपतींनी सुरतेतून लुटलेलं १७ मण सोनं सुरक्षित ठेवल्याचं मानलं जातं. शिवराज्याभिषेकावेळी हे सोनं रायगडावर नेण्यात आलं होतं.

श्री सप्तश्रृंग निवासिनी भगवतीचं मूळ स्वरुप अशा रितीनं समोर येईल, याची कल्पना कुणालाही नव्हती. दररोजच्या सेवेत असलेल्या पुजारी मंडळींपासून ते ट्रस्टच्या सदस्यांपर्यंत तसेच गावकरी आणि अन्य मंडळींना देखील याची पुसटशी देखील माहिती नव्हती. शेंदूर लेपण शास्त्रीय पद्धतीनं काढून आपल्याला देवतेचं पूजन लगेचच पुन्हा सुरु करता येईल, अशी या सगळ्यांची धारणा होती.

Saptashrungi Devi Wani
सह्याद्रीचा माथा : गुरु-शिष्य परंपरा जपणारा व्हावा शिक्षक दिन

तथापि, शेंदूर, लाख, मेण आदी तब्बल ११०० किलो सामग्री सुमारे सव्वाफूट मूर्तीवरुन काढल्यानंतर मूळ स्वरुप समोर आलं. हे मूळ स्वरुप इतकं विलोभनीय आणि रेखीव आहे की, ही मूर्ती एका दृष्टीक्षेपात डोळ्यात साठवणं केवळ अशक्य. नााशिक हे धर्मक्षेत्र. धार्मिक, पौराणिक अनेक संदर्भ नाशिकच्या संपूर्ण परिसराला आहेत.

त्र्यंबकराज आणि सप्तश्रृंग ही देशभर मान्यता पावलेली स्थाने इथल्या लौकीकात भर घालतात. आता आदिमाया, आदिशक्तीच्या मूळ स्वरुपाचा लौकीकही देशभर वाऱ्याच्या वेगानं पोहोचेल आणि उपासना, साधना करणारे संत महात्म्यांचीही पावलं आपसूक सप्तश्रृंग गडाकडे आदिमायेच्या दर्शनासाठी वळतील, यात शंका नाही.

आदिमायेचं मूळ स्वरुप झाकून त्यावर आवरणरुपी आदिशक्ती स्थापित करण्याची बुद्धी, समयसूचकता तत्कालीन सिद्धपुरुष, संत-महात्म्यांना कुणी दिली असेल, या प्रश्नाच्या अनुषंगाने देखील शोधकर्ते शोध घेत आहेत. परकीय आक्रमकांपासून मूळ मूर्तीला हानी पोहोचू नये, हा एक त्यातील हेतू.

यासह तंत्र शास्त्राच्या अंगानं देखील देवीच्या मूळ स्वरुपातील आयुध, शस्त्र-अस्त्र यांच्या संदर्भातील संशोधनाला गती मिळणार आहे. पुढच्या काही वर्षांमध्ये सप्तश्रृंग भगवतीच्या गडावर विकासकामे देखील मोठ्या प्रमाणात होतील, अनेक भाविकांना या माध्यमातून शक्ती आणि भक्तीची प्रेरणा देखील मिळेल.

Saptashrungi Devi Wani
दुनियादारी : देखावे ते नवलच!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()