नुकताच हत्ती दिवस साजरा झाला. हत्ती दिसायला भलामोठ्ठा; पण अतिशय संवेदनशील. अवयव तस्करीमुळे त्रस्त. आपण त्याच्या क्षेत्रात घुसखोरी केलीय हे त्याने समजून घेतलं. मात्र, त्याला समजून घेण्यात आपण कमी पडलोय. अशा वेळी गेली काही वर्षं आनंद शिंदे नावाचा एक मराठी माणूस हत्तीशी संवाद साधत फिरतोय. देशातल्या कुठल्याही जंगलात हत्ती अस्वस्थ असला की ठाण्याच्या आनंदला बोलावलं जातं. हा माणूस हत्तींशी तासन््तास मराठीत बोलतो. हत्ती मान डोलवत असतात. हे सगळं खूप भन्नाट आहे. अशा आनंद शिंदे आणि त्याच्या टीमसाठी डायरीतलं पान...