- जयवंत कुलकर्णी, jayawantmkulkarni@gmail.com
अलीकडच्या वर्षांत जर्मनीतील भारतीय गुंतवणुकीत लक्षणीय वाढ झाली आहे. माहिती तंत्रज्ञान, ऑटोमोटिव्ह, फार्मास्युटिकल आणि बायोटेक उद्योगांमध्ये जर्मनीमध्ये आता २०० हून अधिक भारतीय उद्योग आहेत. भारतातील जर्मन दूतावास व वाणिज्य दूतावासांनी दिलेल्या व्यवसाय आणि नोकरीच्या व्हिसाचे प्रमाण वाढते आहे. आता जर्मनीमध्ये भारतीय, विशेषतः महाराष्ट्रीयन कुशल मनुष्यबळाला मोठा वाव मिळवून देणारी नामी संधी उपलब्ध झाली आहे.