हिंदुत्ववाद्यांच्या कार्यक्रमपत्रिकेवरचा एक दीर्घकाळचा मुद्दा आहे समान नागरी संहितेचा. देशातल्या सगळ्यांना सगळे कायदे समान रीतीनं लागू असले पाहिजेत, हे यातलं आदर्श तत्त्व. देशाच्या राज्यघटनेनंही समान नागरी संहितेचा उल्लेख मार्गदर्शकतत्त्वांत केला आहे. म्हणजेच हे कधी, कसं करायचं हे सरकारवर सोपवलं आहे, ज्यासाठी न्यायालय सक्ती करू शकत नाही.