- संदीप कामत, sandip.kamat@gmail.com, @sankam
ड्रायव्हरलेस किंवा सेल्फ-ड्रायव्हिंग मोटार हे काही वर्षांपूर्वी कधीतरी आपल्या दूरच्या भविष्यात प्रत्यक्षात येऊ शकेल असं स्वप्न वाटत होतं, पण आता कॅलिफोर्निया आणि जगाच्या इतर काही मोजक्या शहरांमध्ये अशा मोटारी हळूहळू कॉमन होऊ लागल्या आहेत. सॅन फ्रान्सिस्को सारख्या काही शहरात आता उबर मार्फत सुद्धा गुगलच्या वेमो कंपनीच्या ड्रायव्हरलेस टॅक्सी ऑर्डर करता येऊ शकतात. सुरुवातीला आपण आपली नेहमीची गाडी चालवताना एखाद्या सिग्नलला थांबलो आणि शेजारी अशी चालकविरहित गाडी येऊन थांबली की लोक चक्रावून जायचे.