डॉ. आनंद नाडकर्णी
आपल्या नातवंडाला गोष्टी ऐकवणं आणि विस्फारीत डोळ्यांनी त्यानं त्या अनुभवणं ह्यासारखं मानवी जन्माचं सार्थक नाही, अशा निष्कर्षाला माझं मन पोहोचलं आहे. माझा नातू अंगद जेमतेम चार वर्षांचा. पण त्याची फर्माईश अगदी स्पष्ट असते. ‘‘तू छोटा होतास तेव्हाची गोष्ट सांग.’’ तो माळव्यामध्ये इंदूरला राहत असल्यानं त्याची हिंदी अगदी लफ्फेदार आहे.