- अरविंद जगताप, jarvindas30@gmail.com
गेल्या दहा-पंधरा वर्षांत अनेक थोबाडलपवे कुठल्यातरी फेक नावाचा आधार घेऊन सोशल मीडियावर चिखलफेक करत असतात. हे फेक प्रोफाईलवाले मालकाचा छू आवाज झाला की समोरच्यावर तुटून पडतात. यांच्याकडे लेखणी नाही. फक्त टोपण आहे. हे ट्रोल शेंडा बुडखा नसलेले टोपण आहेत. लेखणी नसलेलं टोपण म्हणजे मेंदू नसलेलं डोकं. असली टोपणं वेळीच ओळखता आली पाहिजेत.