प्रसिद्ध लेखक सलीम-जावेद यांच्या यशस्वी होण्यामागे अनेक गोष्टी आहेत. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे ते त्यांचं वाचन. त्यांच्यात कॉमन गोष्टीही खूप आहेत. त्यातलीच एक आई. अगदी लहानपणी त्यांच्या आयुष्यातून आई हिरावली गेली. आई नसताना ती जास्त कळते. आई असताना जाणीवच होत नाही काही कमी असल्याची. म्हणून कदाचित आई नसणारा माणूस सगळ्यात जास्त ताकदीने लिहू शकतो, ‘मेरे पास मां हैं!’