- विवेक देबरॉय, saptrang@esakal.com
या सदरातल्या मागील लेखात तर्कशी या पक्ष्याच्या रूपात जन्म घेतलेल्या वापु या अप्सरेचा उल्लेख मी केला होता. तर्कशी कुरुक्षेत्रावर जाते आणि भगदत्त व अर्जुन यांच्यातील महाभयंकर युद्धाची साक्षीदार बनते. जणू टोळधाड पडावी, त्याप्रमाणे अविरत शरवर्षावामुळे आकाश व्यापून गेले होते. अर्जुनाच्या चापातून काळ्या सर्पासारखा दिसणारा एक अणकुचीदार बाण वेगाने सुटला आणि तर्कशीचे पोट चिरत पुढे गेला.