- विवेक पंडित, pvivek2308@gmail.com
स्वातंत्र्यलढ्यामध्ये स्वातंत्र्याला जितकं महत्त्व आहे, तेवढंच सामाजिक आणि आर्थिक समतेलाही आहे, हे साने गुरुजींनी जाणलं होतं. वरोर गावात स्वातंत्र्य आंदोलनासोबतच सामाजिक समतेचेही वारे पसरू लागले. साने गुरुजींचे निस्सीम भक्त असलेले माझे वडील त्यापासून स्वतःला अलिप्त ठेवू शकत नव्हते. ते पूर्ण शक्तीनिशी आपल्या सहकाऱ्यांना घेऊन सेवा दलाचे काम करू लागले. स्वातंत्र्याची ऊर्मी हृदयात घेऊन त्यासाठी झटणाऱ्या भाईंच्या छायेत मी रुजत, उमलत आणि वाढत होतो...