सत्याग्रहाचे कट्टर अनुयायी
नेल्सन मंडेला हे शांतीच्या राजदूतांपैकी एक होते. सलोखा आणि क्षमा यांवर त्यांचा विश्वास होता. महात्मा गांधी आणि त्यांच्या सत्याग्रहाच्या तत्त्वाचे कट्टर अनुयायी होते.
- गॅरी गोविंद सॅमी garyygovindsamy@gmail.com
नेल्सन मंडेला हे शांतीच्या राजदूतांपैकी एक होते. सलोखा आणि क्षमा यांवर त्यांचा विश्वास होता. महात्मा गांधी आणि त्यांच्या सत्याग्रहाच्या तत्त्वाचे कट्टर अनुयायी होते. वर्णद्वेष आणि भेदभावाचा त्यांना तिटकारा होता. सर्व स्तरांतील प्रतिकार चिरडून टाकण्यासाठी राष्ट्रवादी राजवटीने त्यांना जखडून ठेवले. २७ वर्षांच्या कैदेच्या काळात त्यांनी शांततापूर्ण स्थलांतरणासाठी कारागृह अधीक्षकाशी सातत्याने वाटाघाटी केल्या. येत्या १८ जुलै रोजी या शांतीच्या राजदूताची जयंती आहे, त्यानिमित्त...
नेल्सन मंडेला यांचा येत्या सोमवारी १०४ वा जन्मदिवस... ते आज असते, तर संपूर्ण दक्षिण आफ्रिकेने उत्सव साजरा केला असता. नेहमीप्रमाणे मंडेला शेकडो लहान मुलांनी घेरलेले असते. मंडेलांनी त्यांना मिठाई व इतर वस्तू दिल्या असत्या, ते कुठल्याही धोक्यापासून सुरक्षित आहेत याची खात्री मुलांना देण्यासाठी. मंडेला कुप्रसिद्ध रॉबीन बेटावर २७ वर्षे कैदी म्हणून राहिले. या काळात त्यांनी लहान मूल पाहिलेच नव्हते. अगदी त्यांना या कैदखान्यात सडण्यासाठी पाठवण्याआधी जो मॅरेथॉन खटला चालला तेव्हाही नाही. प्रत्येक मूल देवाचे मूल आहे, असे मंडेला म्हणायचे. रस्त्यावरची मुले ही आमचीच आहेत असे ते म्हणायचे. मुलांना सोडून देण्याचा किंवा त्यांना त्रास देण्याचा ते तिरस्कार करत असत. मुलांना शिकण्यासाठी नेहमी प्रोत्साहित करत असत... शिक्षित होण्यासाठी! ‘आमचे शिक्षण आमच्यापासून कोणीही हिरावून घेऊ शकत नाही’ हे त्यांचे बोधवाक्य होते. ‘शिक्षण हे व्यक्तिमत्त्व विकासाचे सर्वोत्तम साधन आहे. शिक्षणाच्या माध्यमातूनच शेतकऱ्याची मुलगी डॉक्टर होऊ शकते, खाण कामगाराचा मुलगा खाणीचा मालक होऊ शकतो, शेतमजुराचा मुलगा देशाचा राष्ट्राध्यक्ष होऊ शकतो,’ असे ते म्हणत.
मंडेला हे शांतीच्या महत्तम राजदूतांपैकी एक होते. सलोखा आणि क्षमा यावर त्यांचा विश्वास होता. शांततापूर्ण स्थलांतरणासाठी त्यांनी कारागृह अधीक्षकाशी वाटाघाटी केल्या. २७ वर्षांच्या कैदेच्या काळात त्यांनी हे सातत्याने केले. सर्व स्तरांतील प्रतिकार चिरडून टाकण्यासाठी राष्ट्रवादी राजवटीने त्यांना जखडून ठेवले. निराशाच पदरी पडत असतानाही त्यांनी कट्टर उजव्या विचारांच्या सरकारशी अथक वाटाघाटी केल्या. नवीन दक्षिण आफ्रिकेबाबत चर्चा करण्याचा हे सरकार तिटकारा करायचे. हे सर्व त्यांनी गुप्तपणे केले. त्यांच्या सहकारी कैद्यांना किंवा आफ्रिकन नॅशनल काँग्रेसच्या नेत्यांनाही याची माहिती नव्हती. त्या वेळी ते राष्ट्रवादी सरकारशी पूर्णपणे संघर्षात गुंतले होते. युद्धामुळे केवळ दुःख, मृत्यू आणि आपत्तीच येते हे मंडेला जाणत होते. नेल्सन मंडेला महात्मा गांधी आणि त्यांच्या सत्याग्रहाच्या तत्त्वाचे कट्टर अनुयायी होते. त्यांनी स्वतःला स्वातंत्र्याच्या सनदेसह शस्त्रसज्ज केले होते आणि तुरुंगातूनच त्यांच्या वाटाघाटी सुरू होत्या. राष्ट्रवाद्यांशी बोलत असताना त्यांनी त्यांचे ‘द लाँग वॉक टू फ्रिडम’ हे हस्तलिखित पुस्तक आणि इतर कागदपत्रे बाहेर पाठवली. ज्याचा वापर तोडगा काढण्यासाठी आणि शत्रुत्व थांबवण्यासाठी झाला. निर्वासित लोक तुकड्यांमध्ये घरी परतले.
तुरुंगातून सुटका झाल्यावर मंडेला यांनी राष्ट्रीय एकात्मतेचे सरकार निर्माण करण्यात मोलाची भूमिका बजावली. आफ्रिकेच्या दक्षिणेकडील टोकावर लढणाऱ्या या दोन गटांमध्ये समेट घडवून आणल्याबद्दल मंडेलांविषयी आजही आदर व्यक्त केला जातो.
पूर्व केपमधील मवेझो या नयनरम्य खेड्यात नेल्सन मंडेलांचा जन्म झाला. त्या भागातील एका फाऊंडेशन स्कूलमध्ये ते शिकले. त्यांच्या शिक्षकाला त्यांचे ‘रोलिहलहला’ हे नाव उच्चारता येत नसे, त्यामुळे त्यांनी त्यांना ‘नेल्सन’ हे टोपण नाव दिले. या होऊ घातलेल्या राजकारण्याने त्यानंतर फोर्ट हेअर आणि विट्सवॉटरसँड विद्यापीठात शिक्षण घेतले. रॉबीन बेटावरील तुरुंगवासाच्या काळात मंडेला यांनी लंडन विद्यापीठातून पदवीचे शिक्षण घेतले. वर्णद्वेष आणि भेदभावाचा त्यांना तिटकारा होता!
नागरी हक्क कार्यकर्ते झालेले मंडेला म्हणतात,
‘आपण जगाला चांगले बनवू शकतो. परिवर्तन घडवून आणणे तुमच्याच हातात आहे.’
‘जग बदलवणे हे कठीण काम नाही, तर स्वतःला बदलणे कठीण आहे.’
‘कुठल्याही अपेक्षेविना दुसऱ्याला मदत करण्यासाठी आपला वेळ आणि ऊर्जा खर्च करण्यासारखी उत्तम भेट दुसरी नाही.’
‘नेता मेंढपाळासारखा असतो. तो कळपाच्या मागे राहतो, सर्वांत चपळ असलेल्यांना पुढे जाऊ देतो. ज्यांचे अनुसरण मागचे करतील. त्यांना मागून कुणी तरी दिशानिर्देश करत आहे याची जाणीवही होऊ देत नाही.’
नेल्सन मंडेला यांच्या शिकवणुकीसाठी जग आतुर आहे. सत्याग्रहाच्या निर्मात्यासाठी महात्मा गांधींसाठी जग आतुर आहे, जे भारताचे राष्ट्रपिता, मंडेला यांचे गुरू आहेत. जगातील प्रत्येक जीवाला आदर आणि सन्मानाने वागवण्याची हमी मिळण्यासाठी ते गरजेचे आहे. तेव्हा हे जग देवाला हवे तसे असेल, मुक्त!
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.