ज्या गिरणगावात एके काळी रसरशीत संस्कृती नांदली, तेथे आता मॉल्स आले, चाळीस मजल्यांचे टॉवर्स आले आहेत आणि येत आहेत. ‘आणखी एक मोहेंजोदारो’ या माहितीपटात काळजाला जखम करणारा संवाद आहे. नव्या बांधकामाभोवती बांधलेल्या पत्र्यांकडे पाहून तो प्रौढ वयाचा निवेदक-जॉबर म्हणतो, ‘पत्र्यांच्या आडून मुंबई कपडे बदलतेय’... ‘आणखी एक मोहेंजोदारो’च्या निमित्ताने गिरगाव-गिरणगावच्या कलासंस्कृतीची सफर.