- प्रा. संदीप पेटारे, sandypetare@gmail.com
जगभर वातावरण दूषित होत चाललेले आहे. मोठ्या शहरांत व औद्योगिक केंद्रांत प्रदूषणामुळे घबराट निर्माण झाली आहे. प्रदूषणाच्या अश्रूंशिवाय औद्योगिक विकास साधता येईल का? या प्रश्नाचे उत्तर देण्याचा प्रयत्न केला, तर आपल्या ध्यानात येते, की काही पथ्ये पाळली, काही नियंत्रक कायद्यांचे कसोशीने पालन केले, तर प्रदूषणाचे नियमन करून आपण औद्योगिकीकरण साधू शकतो.