विकासाच्या प्रक्रियेत माणूस फक्त आणि फक्त स्वतःच्याच प्रेमात अडकला आहे. वातावरणातून मिळणाऱ्या गोष्टी तो ओरबाडून घेतोय. निसर्गाचे चक्र त्यामुळे विस्कळित व्हायला लागले आहे. वातावरणात एकप्रकारचा असमतोल जाणवतो आहे.
जीव विज्ञानाच्या एका पुस्तकात हिरव्या झाडांमध्ये बसलेल्या सिंहाचे छायाचित्र आहे. निरनिराळ्या जीवांना ते कसे दिसेल हेदेखील त्यात दाखविण्यात आले आहे. निळ्या-हिरव्या रंगाचे आंधळेपण असलेल्या व्यक्तीला त्या छायाचित्रातील सिंह गुलाबी दिसतो. बेडकांना काळे-पांढरे ढगांसारखे पुंजके दिसतात. कुत्र्यांना ते चित्र कृष्णधवल स्वरूपात दिसते.