पृथ्वी थिएटर फेस्टिवल आणि अख्तरीबाई

रंगभूमीच्या प्रेमाखातर ही नाट्यसंस्था सुरू केली. पृथ्वी थिएटरतर्फे सादर केलेलं पहिलं नाटक म्हणजे ‘शाकुंतल’.
पृथ्वी थिएटर फेस्टिवल आणि अख्तरीबाई
Updated on

प्रा. अविनाश कोल्हे

विवार, ३ नोव्हेंबरपासून मुंबईतील आणि काही प्रमाणात देशातील रंगकर्मी अन् नाट्यरसिक ज्याची आतुरतेने वाट पाहत असतात, तो ‘पृथ्वी थिएटर फेस्टिवल’ सुरू होत आहे. हा नाट्यमहोत्सव १८ नोव्हेंबरपर्यंत जुहूच्या पृथ्वी थिएटरमध्ये होणार आहे. पंधरा दिवस चालणाऱ्या या महोत्सवात नसिरुद्दीन शहा, वीणापती चावला, मानव कौल, मकरंद देशपांडे वगैरे नामवंत मंडळींचं सादरीकरण, रुक्मिणी विजयकुमार यांचं नृत्य, आरती अंकलीकर- सुरेश बापट यांचं शास्त्रीय गाणं, ल्युईस बँकचं जॅझ इत्यादी भरगच्च मेजवानी आहे.

हा महोत्सव १९८३ साली सुरू झाला. तेव्हापासून कोरोना महामारीसारख्या घटना वगळता तो सुरू आहे. पहिल्या पृथ्वी थिएटर फेस्टिवलची सुरुवात गो. पु. देशपांडे यांच्या ‘उद्ध्वस्त धर्मशाळा’च्या प्रयोगाने झाली होती. पृथ्वीराज कपूर (१९०६-१९७२) यांनी १९४४ मध्ये मुंबईत ‘पृथ्वी थिएटर’ ही नाट्यसंस्था हिंदी नाटकांसाठी स्थापन केली. त्या काळी पृथ्वीराज कपूर हे हिंदी सिनेमाजगतातील मोठं नाव होतं. १९३१ मध्ये आलेला भारतातील पहिला बोलपट ‘आलमआरा’मध्ये त्यांनी भूमिका केली होती. त्यांनी रंगभूमीच्या प्रेमाखातर ही नाट्यसंस्था सुरू केली. पृथ्वी थिएटरतर्फे सादर केलेलं पहिलं नाटक म्हणजे ‘शाकुंतल’.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.