माणसाला विचार करण्याची शक्ती आहे. त्या विचारांचा विस्तार तो त्याला हवा तसा करू शकतो. त्या कल्पनाशक्तीच्या जोरावर तो आपल्या अस्वस्थ प्रश्नांना झाकण्यासाठी विश्वदर्शनाचे खोटे मनोरे उभे करतो. त्यातून हाती काही येत नाही; पण त्याने तो स्वतःच स्वतःच्या मनाची समजूत मात्र काढू शकतो. याच पूर्वसंस्कारित कोषातून पुढच्या पिढ्यांना प्रश्न पडणार नाहीत, याची काळजी घेतली जाते. स्वतःभोवतीचे हे पूर्वसंस्कारित कोष पुढच्या पिढीसाठी आपण केलेली कवचकुंडले आहेत, असे आपल्याला वाटत असले, तरी तो त्यांना निष्क्रिय बनवण्याच्या जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न ठरतो.