- विवेक पंडित, pvivek2308@gmail.com
अनेकदा सूर्यास्त होण्याच्या वेळेला मी एकटाच घरातून निघून समुद्राकडे जाणाऱ्या शेतावरील बांधावरून अनवाणी धावत जात असे. एखादा काटा लागला, तर तो काढत जात असे. अंधाराची भीती मला लहानपणापासून आहे. कदाचित याच लहानपणाच्या भयातून मी नंतर आयुष्यभर इतरांच्या जीवनातील अंधार शोधित फिरलो... दुसऱ्या दिवशी सूर्य पुन्हा उगवणार आहे, हे जरी सत्य होते तरी तो आज मावळायला नको, असंच वाटत राही.