चला ‘सहकार’ संस्कृतीकडे

मातृभूमीचे हृदय खेड्यांमध्ये आहे आणि तिथेच देवी लक्ष्मीचे सिंहासन आहे,’ असे गुरुदेव टागोर सांगत
independence day 2022 Cooperative culture
independence day 2022 Cooperative culture
Updated on

सहकार

गुरुदेव रवींद्रनाथ टागोर सहकाराच्या संकल्पनेबद्दल सुंदररीत्या व्यक्त होतात. ‘आपण आपली खरी मातृभूमी खेड्यांमध्ये पाहतो. मातृभूमीचे हृदय खेड्यांमध्ये आहे आणि तिथेच देवी लक्ष्मीचे सिंहासन आहे,’ असे गुरुदेव टागोर सांगत. ‘माणसे सहकारातून आपल्या कार्याचे रूपांतर सर्वांसाठीच्या संपत्तीत करायला शिकतील आणि त्यानंतरच स्वातंत्र्याची खरी पायाभरणी होईल,’ अशा शब्दांत टागोरांनी सहकाराचे महत्त्व व्यक्त केले आहे. भारतीयत्व, भारतीय संस्कृती आणि परंपरांचे ते श्रेष्ठ अभ्यासक आणि पाठीराखे होत.

--------------------------

भौतिक

संघटनात्मक बांधणी, आर्थिक नाड्या, शिक्षण, सामाजिक, क्रीडा अशा सर्वच क्षेत्रांवर जबरदस्त पकड असलेले सहकार क्षेत्र दीर्घकाळ आहे, हे चित्र बदलण्यासाठी आमूलाग्र बदल करावा लागणार आहे.

सहकारी तत्त्वावरील संस्था उभ्या करून चालविणाऱ्या व्यक्तींनी आपण लोकांचे विश्‍वस्त आहोत, ही भावना जागृत ठेवायला हवी. अशा भावनेने काम करणाऱ्या संस्थांमधून उत्तम नेतृत्व घडल्याचा इतिहास आहे.

सहकार क्षेत्रावर अलीकडच्या काळात लादलेले अवाजवी निर्बंध कमी करावेच लागतील. सहकारी आर्थिक संस्थांची पतपुरवठ्याची विशिष्ट रचना लक्षात घेऊन त्यांच्यासाठी स्वतंत्र नियमनाची चौकट असली पाहिजे.

जागतिक उत्पादनांना तोंड देणारा दर्जा सहकारातील उत्पादनांना दाखवावा लागणार आहे. त्यासाठी त्यांना आर्थिक आणि तांत्रिक मदत करण्याची जबाबदारी सरकारची आहे. कारण, देशातील बाजारपेठ जागतिक उत्पादनांना खुली झाल्यानंतर त्या दर्जाशी, वेगाशी आणि प्रवृत्तीशी सामना करण्यात सहकार कमी पडत गेला.

सहकारातील सर्व क्षेत्रे स्थानिकांच्या प्रयत्नातून आणि भांडवलातून उभी राहात असतात. त्यामुळे, सहकारी सेवा आणि उत्पादने आवर्जून विकत घेतली पाहिजेत.

-------------------------

भविष्यातील अपेक्षा

भारतीय सहकारी संस्थांच्या उत्पादनांचे ब्रँडिंग करण्याची योजना,

उत्पादनांचे बाजारपेठेत सुयोग्य विपणन

करणारी यंत्रणा उभारणी

---------------------

भविष्यातील अपेक्षा

सहकारी उत्पादनाची ओळख, संबंधित समुदायातील

सहकारी तत्त्वाची बांधिलकी यांना बळ देणे, विक्री व्यवस्थेतून सहकारी पतपुरवठा संस्थेच्या सभासदांच्या लाभाचा विचार

-----------------------------

भविष्यातील अपेक्षा

देशातील ६३ हजार प्राथमिक कृषी सहकारी पतपुरवठा संस्थांचे संगणकीकरण सुरू,

संगणकीकरणात क्लाऊड तंत्रज्ञान, सुरक्षा, विदा व्यवस्थापन, विद्यमान नोंदीचे डिजिटायझेशन,

प्रशिक्षणाचा समावेश

-----------------------------

भविष्यातील अपेक्षा

भारतीय भाषांमध्ये व्यवहार, राज्यांच्या

गरजांनुसार बदलांची व्यवस्था, संगणकीकरणामुळे सहकारी पतपुरवठ्यात

अधिक पारदर्शकता येणार

------------------------------

भविष्यातील अपेक्षा

देशभरातील ४५ लाख विक्रेते, सेवा पुरवठादार ‘जीईएम’वर उपलब्ध, पतपुरवठा संस्थांना ‘जीईएम’वर कामकाजासाठी

सर्व प्रकारच्या मदतीची व्यवस्था

----------------------------

भविष्यातील अपेक्षा

गव्हर्न्मेंट ई मार्केटप्लेस-स्पेशल पर्पज व्हेईकलद्वारे (जीईएम-एसपीव्ही) ऑनलाइन खरेदी-विक्री व्यवस्था, पतपुरवठा संस्थांना खुल्या आणि पारदर्शी प्रक्रियेतून स्पर्धात्मक दर मिळणार

-------------------------------

आध्यात्मिक

कुळ (कुटुंब) हे सहकारी तत्त्वाचे मूळ म्हणून भारतात मान्य होते. कुटुंबातील स्त्री-पुरुष-ज्येष्ठ-कनिष्ठांचा परस्परांशी आर्थिक, सामाजिक सहकार हा भारतीयत्वाचा गाभा होता. कुटुंब, गावाने एकत्र येऊन केलेल्या यज्ञासारख्या संस्कारात सहकारी तत्त्वाची मुळे आहेत.

सहकारातील पद, प्रतिष्ठा ही लोकांच्या सेवेची संधी आहे, ही विवेकबुद्धी सतत जागृत हवी. मिळालेल्या संधीचा लोककल्याणासाठी वापर करणे आणि स्वार्थापासून दूर राहणे सहकारी क्षेत्रात काम करणाऱ्यांच्या विचारसरणीचा भाग व्हायला हवा.

सहकार हा व्यक्तिगत जीवनाचाही भाग असू शकतो. सहकार हा स्पर्धात्मक, समाजाच्या भल्याचाच विचार होता.

दहीहंडीसारखा परंपरागत सण सहकारी भावनेचेच उदाहरण. भारतीय परंपरेतून आलेले सणवार सहकाराचे मूलतत्त्व शिकवणारे आहेत.

भ्रष्टाचाराचा उगम असलेली निवडणूक प्रक्रिया, खरेदी-विक्रीतील व्यवहार, मक्तेदारी मोडून काढणे आणि स्थानिक सर्वांगीण विकासाला चालना देणे या चार सूत्रांवर पुढे जावे लागेल. त्यासाठी तरुण वर्गाचा सहकारातील वावर वाढवावा लागेल. विसाव्या शतकातील सहकाराचा पाया महाराष्ट्राने रचला. एकविसाव्या शतकातील सहकाराचा पायाही रचण्याची संधी आहे.

---------------------

१७३ महाराष्ट्रातील सहकारी साखर कारखाने

१२२ महाराष्ट्रातील सूत गिरण्या

१५ हजारमहाराष्ट्रातील दुग्धसंस्था

३९,७८१ शेती प्रक्रिया उपक्रम संस्था

--------------------

आत्मनिर्भर सहकारी संस्थांचे उद्दिष्ट गाठायचे असेल, तर लोकांमध्ये सहकारी मूल्ये रुजवली पाहिजेत. आर्थिक प्रगतीसाठी सुसंगत धोरणे, कायदेशीर आणि संस्थात्मक उभारणी केली पाहिजे. केंद्रीय सहकार मंत्रालय नेमके यादृष्टीने रस्ता आखत आहे. सहकाराची लोकचळवळ व्हावी, ती तळागाळापर्यंत पोहचावी आणि सहकारप्रणीत अर्थव्यवस्था निर्माण करून सहकारातून समृद्धी हा पंतप्रधान नरेंद्र मोदींचा मंत्र प्रत्यक्षात आणावा, हा नव्या धोरणांचा उद्देश आहे.

- हेमा यादव, संचालक, व्हॅमनिकॉम

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()