पर्यावरण
रासायनिक खते, रासायनिक औषधे, प्लास्टिक, औद्योगिक क्षेत्रातील तयार होणारे बायप्रॉडक्ट्स वगैरे अनेकानेक गोष्टींचा समावेश होतो. सद्यःस्थितीत पर्यावरणाचा ऱ्हास भरून यावा आणि नवीन बिघाड होऊ नये, या दोन्ही पातळ्यांवर काम होणे गरजेचे आहे. पर्यावरणीय संवेदनशील भागात कोणत्याही प्रकारच्या पर्यटनाला मज्जाव असावा.
भौतिक...
वृक्षसंवर्धन करणे. हे करताना आपल्या परिसरात कोणत्या वृक्षांची (देशी) गरज आहे ते ओळखून शासनाने यासाठी पुढाकार घ्यावा. (सविस्तर यादी esakal.com)
नैसर्गिक संसाधनांचा जपून वापर करणे. उदा. कागद वाचवणे, पाण्याची उधळपट्टी न करणे, विजेचा गैरवापर न करणे असे विविध मार्ग सर्वसामान्य नागरिकांनी तसेच सरकाने उपलब्ध केले पाहिजेत.
शास्त्रीय संगीत, मंत्र यांच्या साहाय्याने वातावरण प्रसन्न ठेवण्यासाठी शाळांपासून ते सर्व सार्वजनिक ठिकाणी, सरकारी कार्यालयामध्ये याचा वापर करावा.
प्लास्टिकचा वापर कमीत कमी करणे, कापडी पिशव्या, बाटल्या, डबे वस्तू आणण्यासाठी सर्वसामान्य नागरिकांनी पुढाकार घ्यावा.
कचरानिर्मिती कमी करावी. कचरा व्यवस्थापन घरच्या घरीच करावे.
घराच्या भोवती शक्य असल्यास देशी वृक्षांची लागवड करावी.
प्रौढ व्यक्तींनी वर्षातून किमान एक झाड लावून ते जगवावे.
डोंगर, पठार, टेकडी, गवताळ कुरणे अशा नैसर्गिक भूरूपांच्या संवर्धनासाठी जे कायदे आहेत, त्यांची सरकारने चोख अंमलबजावणी करावी.
----------------------
भविष्यातील अपेक्षा
रासायनिक खते, औषधे यांचा वापर कमी करणे. सेंद्रिय खाद्यवस्तूंचा वापर वाढवणे. कचऱ्याची विल्हेवाट घरच्या घरीच करून खतनिर्मिती करणे.
----------------------
भविष्यातील अपेक्षा
प्राचीन काळापासून देवांसाठी म्हणून देवराई तयार करण्यात येत होती. गावपातळीवर या पद्धतीच्या देवराई तयार करण्याचे काम ग्रामपंचायतींनी करावे.
------------------------
भविष्यातील अपेक्षा
निसर्गाची फुफ्फुसे समजली जाणारी वनराई दिवसेंदिवस का कमी होत आहे, याचा विचार करणे. जंगलांचे क्षेत्रफळ कमी होण्याची निश्चित कारणे शोधणे.
------------------
भविष्यातील अपेक्षा
वनक्षेत्रातील खासगी मालकीच्या जमिनीसाठी असणाऱ्या नियमांची काटेकोर अंमलबजावणी करणे.
-----------------
भविष्यातील अपेक्षा
पर्यावरणीय संवेदनशील क्षेत्रामधील मानवी हस्तक्षेप पूर्णपणे बंद करणे. वन्य जीवांचे अधिवास, भ्रमणमार्ग संरक्षित करावेत. तेथे मानवी हस्तक्षेपास मनाई करणे
-------------------
भविष्यातील अपेक्षा
वाढत्या शहरीकरणाचा पर्यावरणावर काय परिणाम होत आहे, याची दखल घेणे. औद्योगिकीकरणामुळे हवा, ध्वनीच्या प्रदूषणात होणारी मोठी वाढ
--------------------------------------------------
राज्यात अतिघनदाट जंगलाचे प्रमाण ३.४ टक्के असून ते ७ ते ८ टक्के असणे आवश्यक
मध्यम घनदाट जंगलाचे प्रमाण ९.३३ टक्के असून ते १२ टक्के असणे आवश्यक आहे.
विरळ (खुले) जंगल याचे प्रमाण २१.७१ टक्के तर खुजी (काटेरी) झुडपे याचे प्रमाण १.४२ टक्के असून हे प्रमाण पर्यावरणीय दृष्टिकोनातून अयोग्य आहे.
राज्यात जंगल नसणाऱ्या क्षेत्राचे प्रमाण ७६.८७ टक्के असून हे प्रमाण धोकादायक स्थिती दर्शवते.
राज्याचा विचार करता अतिघनदाट व मध्यम घनदाट जंगलाचे प्रमाण २५ टक्के असणे आवश्यक आहे.
खुजी (काटेरी ) झुडपे निसर्गाशी सुसंगत नसल्याने त्याचे प्रमाण अत्यल्पच हवे.
-------------------
आध्यात्मिक...
अध्यात्म म्हणजे शुद्धता वाढवणारे जे नैसर्गिक साधन आहे, त्याचा पुरस्कार करणे व निसर्गपूरक जीवनशैली अवलंबणे.
पर्यावरणाला हानी पोहोचू नये किंवा त्याचा ऱ्हास होऊ नये, यासाठी निसर्गपूरक तत्त्वांची जीवनशैली प्रत्येक माणसाने आचरणात आणल्यास दीर्घायुषी व आरोग्यदायी जीवन जगता येते. (सविस्तर esakal.com वर)
पर्यावरणाचे रक्षण आणि त्याच्या योग्य वापरासाठी सरकारने धोरण ठरवणे आवश्यक.
पंचमहाभूते तसेच आयुर्वेदाने अग्नी, वायू, जल यांना परमेश्र्वराचीच उपाधी दिली आहे. वनस्पतींना देवता म्हणून संबोधलेले आहे. पर्यावरणातील प्रत्येक जीवमात्राचे रक्षण करावे, शांतिपूर्ण व्यवहार असावा, शुद्धतेचे भान ठेवून सर्वसामान्य नागरिकांनी कृती करावी. निसर्गपूरक सण जशी नागपंचमी व त्याचा गुढार्थ समजून घेऊन सण साजरे करावेत. (सविस्तर esakal.com वर)
सर्वसामान्य नागरिकांनी स्वतःचे कर्तव्य योग्य प्रकारे न करणे, निसर्गनियमांना डावलून स्वतःच्या स्वार्थासाठी अयोग्य प्रकारे वागणे थांबवावे, यासाठी शासनानेही नियमांची कठोर अंमलबजावणी करावी.
पंचतत्त्वांमध्ये बिघाड उत्पन्न झाला, काळ बिघडला की त्यावर सहजासहजी उपचार करता येत नाहीत. वातावरणातील बदलाचा मनुष्य शरीरावर परिणाम होत असल्याने आरोग्य बिघडू शकते.
पंचमहाभूते ही निसर्गपूरक, खरे तर सर्वच प्राचीन भारतीय शास्त्रांमधील एक मूळ संकल्पना असून याची प्रत्येक घरात माहिती असल्यास कुटुंबाचे जीवन आरोग्यदायी बनेल.
---------------------
पर्यावरणाच्या संवर्धनासाठी निसर्गाशी जवळीक साधली पाहिजे. घरगुती कचऱ्याची निर्गत घरातच होणे आवश्यक आहे. यासाठी कचऱ्यापासून गॅस निर्मिती किंवा खत निर्मिती असे पर्याय उपलब्ध आहेत. याचे अनेक यशस्वी प्रयोग सर्वत्र पाहायला मिळतात. याशिवाय पाण्याचा नियोजनबद्ध वापर, प्लास्टिक आणि इंधनाचा कमीत कमी वापर. आपल्याला उपलब्ध असणाऱ्या जागेमध्ये वृक्ष, वेली यांची लागवड. या उपाययोजना व्यक्तिगत स्तरावर होऊ शकतात. शासनाने पर्यावरण संवर्धन पूरक धोरण बनवणे व त्याची काटेकोरपणे अंमलबजावणी करणे गरजेचे आहे.
- तृप्ती देशपांडे (सदस्य, अर्थ वॉरियर)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.