- विवेक पंडित, pvivek2308@gmail.com
आणीबाणीमध्ये लोकांना उघड बोलण्याची चोरी झाली होती. कोणी साध्या वेषातील पोलिस आपल्याला ऐकत तर नसेल ना आणि आपल्याला उचलून घेऊन तुरुंगात डांबणार तर नाही ना, अशी भीती प्रत्येकाच्या मनात असायची. आणीबाणीच्या आधीचा आणि नंतरचा कालखंड याच दशकात आपल्या देशाने अनुभवला. मी तरुण वयात हे सारं अनुभवत होतो आणि एक प्रचंड अस्वस्थता माझ्या मनात त्या वेळेला खदखदत होती, जशी देशातल्या असंख्य तरुणांच्या मनात होती... स्वातंत्र्यानंतर प्रथमच बिगर काँग्रेसचे सरकार देशात सत्तेवर आले तेव्हा माझ्यासारख्या तरुणांना देशाला खरेखुरे स्वातंत्र्य मिळाल्याचा आनंद झाला.