प्रा. अभिजित कांबळे
एकोणिसाव्या शतकाच्या मध्यापर्यंत भारतात ब्रिटिश सत्ता सुस्थिर झाली. काश्मीरच्या पर्वतराजीत, राजस्थानात आणि पंजाबमध्ये ज्या वेळी भारतीय लघुचित्रशैली निर्माण होत होती, त्याच वेळी पाश्चात्त्य कलेतल्या नवीन कल्पना आणि तंत्र विकसित झालं. हुबेहूब चित्रण करणाऱ्या आणि त्रिमितीचा आभास निर्माण करणाऱ्या पाश्चात्त्य चित्रशैलीचं आकर्षण वाढू लागलं. जॉन ग्रिफिथ्स, ग्रीनवूड, बर्न्स या ब्रिटिश चित्रकारांचा प्रभाव अधिकाधिक वाढत गेला.