साधारणतः सतराव्या शतकापर्यंत भारतीय वस्त्राला युरोपीय बाजारपेठेत मोठी मागणी होती. तलम मलमल, लाकडी ठोकळ्यांनी छाप उठवलेलं सुती छिंट या प्रकारची वस्त्रं युरोपीय बाजारात अव्वल होती. या वस्त्रांच्या तुलनेत स्थानिक युरोपीय मालाला उठाव नव्हता. युरोपीयांनी भारतात पाय रोवायला सुरुवात केली तेव्हा भारताचा वस्त्रनिर्मिती-व्यवसाय रोखण्याचा विचार केला.