- भक्ती सामंत, Bhakti.samant@kokilabenhospitals.com
‘डब्ल्यूडब्ल्यूएफ लिव्हिंग प्लॅनेट रिपोर्ट’नुसार भारतीयांच्या खाद्यपद्धती आपल्या पृथ्वीसाठी अधिक शाश्वत आणि पूरक आहेत. भारतीय खाद्यपदार्थ म्हणजे आपली सांस्कृतिक संपदाच आहे. एक प्रकारे पोषणाचे पॉवरहाऊस... गरमागरम खिचडी असो किंवा मसालेदार माशाची आमटी, भारतीय खाद्यपदार्थ म्हणजे स्वाद आणि शरीर व पृथ्वीसाठी फायदेशीर अन्न कसे असावे, याचे एक उत्तम जागतिक उदाहरण आहे.