- श्रीराम खाडिलकर, Shriramk1@rediffmail.com
भारतीय चित्रकला आणि युरोपीय चित्रकला यांच्यात एक मोठा फरक आहे. भारतीय चित्रण हे आदर्शवादी पद्धतीचं, तर युरोपीय चित्रण वास्तववादी पद्धतीचं आहे. याचं कारण, ग्रीक आदर्शवादावरच युरोपीय संस्कृतीचा विकास झाला आहे. ही वैचारिक दरी कमी होण्याची प्रक्रिया युरोपीयांचा भारतात प्रवेश झाला तेव्हापासून कमी व्हायला लागली. युरोपीय लोकांनी व्यापाराच्या निमित्तानं भारतात पहिलं पाऊल ठेवलं ते पंधराव्या शतकात.