- प्रतिमा जोशी, pratimajk@gmail.com
तेहरानच्या विद्यापीठात शिकणारी तरुणी अहोऊ दारयेयी हिला हिजाब नीट परिधान केला नाही म्हणून धमकावण्यात आले. त्याचा निषेध म्हणून तिने विद्यापीठातच स्वतःचे कपडे काढले आणि अंतर्वस्त्रावर वावरण्यास सुरुवात केली. तिने कट्टरपंथी पुरुषी व्यवस्थेला केलेला विरोध तिला कस्टडीत घेऊन गेला. मात्र, इराणमधील महिला संघटना तिच्या मागे ठामपणे उभ्या राहिल्या आहेत.