वर्षभर सुरू असलेल्या इस्राईल-पॅलेस्टाईन युद्धादरम्यान आता हिज्बुल्लाचा प्रमुख आणि हमासचा म्होरक्या मारला गेला. दोन महत्त्वाच्या नेत्यांना ठार करण्यात इस्राईलने यश मिळवले. हमास आणि हिज्बुल्लासाठी तो सर्वात मोठा धक्का मानला जात आहे. दोन्ही कडव्या संघटनेची पहिली फळी गारद झाल्याने आता मोठ्या रक्तपातानंतर इस्राईल-पॅलेस्टाईनमध्ये शांततेचा मार्ग खुला होईल का?