सह्याद्रीचा माथा : खानदेशातील राजकारण कूस बदलतेय...

Political News : गेल्या अनेक महिन्यांपासून ज्या घटना घडामोडींची राजकीय क्षेत्रात वाट पाहिली जात होती, ती राजकीय समीकरणे आता अत्यंत वेगाने बदलली जात आहेत.
Eknath Khadse, Unmesh Patil, Girish Mahajan, Mangesh Chavan
Eknath Khadse, Unmesh Patil, Girish Mahajan, Mangesh Chavanesakal
Updated on

गेल्या अनेक महिन्यांपासून ज्या घटना घडामोडींची राजकीय क्षेत्रात वाट पाहिली जात होती, ती राजकीय समीकरणे आता अत्यंत वेगाने बदलली जात आहेत. किंबहुना आता पुढच्या काही दिवसांमध्ये या घडामोडी परमोच्च बिंदू गाठणार आहेत. तुंबून राहिलेल्या घडामोडींनी वेग घेतला तो भाजपाचे उमेदवार जाहीर झाल्यानंतर.

अनपेक्षितरित्या रक्षा खडसे, स्मिता वाघ यांची उमेदवारी जाहीर झाली. रक्षा यांना त्यांच्या चांगल्या कामामुळे उमेदवारी मिळणे अपेक्षितही होते. पण राजकीय गणितांमुळे त्यांची कोंडी होणार की काय, अशी शक्यता वर्तवण्यात येत होती. तर स्मिता वाघ यांचे नाव फारसे चर्चेत नसताना त्यांच्या गळ्यात उमेदवारीची माळ पडली.

रक्षा यांच्या संदर्भात दिल्लीश्वरांचा वरदहस्त तर स्मिता यांच्या संदर्भात अभाविपचे केडर कामी आले. ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या प्रवेशाबाबत त्यांनी स्वतः स्पष्ट सांगितल्याने आता या घडामोडींचा दुसरा टप्पा सुरु झालेला आहे. (jalgaon saptarang latest article n Politics in Khandesh loksabha election 2024 news)

रक्षा खडसे यांची उमेदवारी एकनाथ खडसे यांनी अत्यंत प्रतिष्ठेची केलेली होती. जर रक्षा यांना भाजपाने दूर सारले असते तर एकनाथ खडसेंनी क्लुप्त्या करत राष्ट्रवादीच्या गोटातून त्यांच्यासाठी मार्ग मोकळा केला असता, स्वतः मैदानात उतरु असे स्पष्ट इशारे खडसेंनी देऊन झालेले होते. पण रक्षा यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर खडसे अधिक सक्रिय झाले.

स्वतःच्या भाजपाचा प्रवेशाचा मार्गही त्यांनी सुकर करुन घेतला. या घडामोडींमध्ये ज्येष्ठ नेते गिरीश महाजन आणि युवा नेते मंगेश चव्हाण यांनी त्यांच्याशी जुळवून घेतल्याचे काही वरिष्ठ नेते, पदाधिकारी आत्मविश्वासाने सांगत आहेत. जर खडसे यांचा प्रवेश निश्चित असेल, तर तो आमच्या सहमतीने झाला, हे चित्र उभे राहण्यासाठी ही खेळी समजली जात आहे. 

या सगळ्या धामधुमीत विद्यमान खासदार उन्मेष पाटील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात दाखल झाले. आघाडीकडून करण पवार यांच्या उमेदवारीसाठी उन्मेष पाटील यांचे मित्रप्रेम जागले. या एका खेळीमुळे शिवसेना एका दिवसात बलवान झाल्यासारखा दिसू लागला. मोठे आव्हान भाजपासमोर उभे राहिले.

२०१९ च्या लोकसभा निवडणुकीतील एक महत्त्वाची घडामोड म्हणजे विद्यमान खासदार ए. टी. पाटील हे खडसे समर्थक असल्याने त्यांना टार्गेट केल्याची चर्चा आजही अधुनमधून रंगते. ते ए. टी. पाटील आता पुन्हा सक्रिय झाले आहेत. भाजपाकडून आपल्याला पुन्हा संधी मिळू शकते, अशी आशा त्यांना करण पवार यांच्या आघाडीतील प्रवेशामुळे वाटते आहे. (Jalgaon Political News)

Eknath Khadse, Unmesh Patil, Girish Mahajan, Mangesh Chavan
सह्याद्रीचा माथा : खानदेशातील राजकीय पेच वाढण्याची चिन्हे !

खडसे यांची घरवापसी ए. टी. पाटील यांच्यासाठी आल्हाददायक आहे. तथापि, भाजपा आता कोणत्याही मतदारसंघातील उमेदवारी बदलण्याच्या विचारात नाही. ऐनवेळी उमेदवारी बदलामुळे पक्षाच्या प्रतिमेला तडा जावू शकतो, हे भाजपातील वरिष्ठ जाणून आहेत.

 धुळ्यातील भाजपाची परिस्थिती बऱ्याचअंशी नाशिक लोकसभेच्या समीकरणांवर अवलंबून आहेत. छगन भुजबळ यांच्या संदर्भातील नाशिकचा निर्णय अजून झालेला नाही. शिवसेना शिंदे गटाची उत्तर महाराष्ट्रातील एकमेव जागा हातून गेल्यास धुळ्यासाठी शिंदेंचे समर्थक आग्रही आहेत.

त्यामुळे उमेदवारी बदलाबदली ऐवजी मतदारसंघ बदलाचा विचार होऊ शकतो का, याचाही कयास राजकीय निरीक्षक लावत आहेत. त्यातून चंद्रकांत रघुवंशी यांचे नाव समोर येत आहे. नंदुरबारमध्ये विद्यमान खासदार हिना गावित यांच्या पारड्यात पक्षाने वजन टाकलेले असले तरी त्यांच्यासाठीही वाटचाल बिकट आहे.

शिंदेंची शिवसेना त्यांचे काम करण्यासाठी इच्छुक नाही. अन्यही बरेच गट नाराज आहेत. पर्यायाने पाडवी पुत्राकडे नाराज गट गेल्यास हादरे वाढू शकतात. एकूणच कमी अधिक प्रमाणात खानदेशातील मतदारसंघांमध्ये राजकीय उलथापालथींचा वेग येत्या काही दिवसांत अधिक तीव्र होईल, हे स्पष्ट आहे. 

Eknath Khadse, Unmesh Patil, Girish Mahajan, Mangesh Chavan
सह्याद्रीचा माथा : मालेगावातील ‘ती’ मोसम नव्हे, तर मोक्षगंगा !

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.