जम्मू आणि काश्मीरमध्ये दहा वर्षांनी आणि ३७० वं कलम हटवलं गेल्यानंतर पाच वर्षांनी निवडणुका होत आहेत. मधल्या काळात राज्यघटनेतलं ३७० वं कलम हटवल्यानं जम्मू आणि काश्मीरला असलेला वेगळा दर्जा तर गेलाच; पण राज्याचं रूपांतर केंद्रशासित प्रदेशात करण्याची अभूतपूर्व घटना घडली. केंद्र सरकारच्या या निर्णयावर बरीच उलटसुलट चर्चा झाली आहे.