- केतन पुरी, ketan.author@gmail.com
तमिळनाडू अनेक गोष्टींसाठी प्रसिद्ध आहे. भारताचं दक्षिणेकडील राज्य आणि आग्नेय आशियासोबत कमीत कमी हजार वर्षांपासूनचे संबंध अबाधित ठेवणारा भूभाग म्हणून तमिळनाडू प्रसिद्ध आहे. पल्लव, चोळ, मराठ्यांसारख्या राजसत्तांनी या राज्यात अनेक धार्मिक वास्तू उभारल्या, महाल उभारले, ग्रंथालये उभारली. तमिळनाडूमधील मंडगपट्टू येथे पल्लव राजा महेंद्रवर्मन याने पहिली शैवलेणी खोदली.