- डॉ. स्मिता पाटसकर
स्वच्छ, शुद्ध आणि २४ तास पाणी मिळावं अशी प्रत्येक नागरिकाची इच्छा असते आणि तसंच ही प्राथमिक गरज पुरवणे हे सरकारचे प्रथम कर्तव्य आहे. अर्थात याच्यात अडचणी पण तेवढ्याच येत असतात. धरणापासून जलशुद्धीकरणापर्यंत असलेल्या पाइपलाइन्स आणि तेथूनही सर्व लोकांपर्यंत पसरलेलं त्यांचं जाळ याला अनेक वेळा गळती लागते मग त्याचे कारण काही असो.