कुडाळमध्ये होणाऱ्या एका नाट्य महोत्सवात वऱ्हाडी भाषेतील नाटक आयोजकांतर्फे नाकारण्यात आले. आमच्या प्रेक्षकांना वऱ्हाडी नाटक रुचणार नाही, असे तोंडी कारण आयोजकांतर्फे देण्यात आले. एक कलाकृती भाषेच्या कारणावरून नाकारणे तमाम रंगकर्मी, अभ्यासक, प्रेक्षक, लेखक आणि विचारवंतांना पटलेले नसून रंगभूमीच्या प्रेक्षकांची भेदभावपूर्ण वाटणी नको, असे त्यांचे म्हणणे आहे...